श्री स्वामी समर्थ मठ डामरे येथे रक्तदान शिबिर संपन्न

26 रक्तदात्यांनी केले रक्तदान

डामरे ग्रामस्थ मंडळ डामरे, श्री स्वामी समर्थ मठ आणि सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिर डामरे कानडेवाडी येथे संपन्न झाले. या शिबिरात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले.
माजी सरपंच चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांच्या संकल्पनेतून व विद्यमान सरपंच किरण कानडे,डामरे ग्रामस्थ व स्वामी समर्थ मठ यांच्या परिश्रमातून हे शिबीर यशस्वीपणे पूर्ण झाले.
यावेळी माजी सरपंच बबलू सावंत, विद्यमान सरपंच किरण कानडे, माजी सैनिक श्री. गोविंद पेडणेकर,पत्रकार गणेश जेठे , उपसरपंच श्री.सागर साटम स्वामी समर्थ मठाचे साईनाथ सावंत, विनायक पारधीये, राजु डिचवलकर, निलेश साईल, अभिषेक सावंत
सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान शाखा कणकवलीचे अध्यक्ष श्री अमोल भोगले, कार्याध्यक्ष अभिषेक नाडकर्णी, सदस्य किरण सामंत, पवन भोगले, सचिन जाधव, जिल्हा रक्त पेढी सर्व टीम, डामरे ग्रामस्थ व रक्त दाते उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!