नेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण!

अनंतराव उचगांवकर नॅब संस्था अध्यक्ष

मळगाव येते कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

सावंतवाडी तालुक्यातील मळगाव येथील कै.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर ने आमच्या सहकार्याने आजचे आयोजित केलेले नेत्र तपासणी शिबीर हे सामाजिक बांधिलकी जागृत असल्याचे लक्षण आहे,” असे मत नॅब संस्थेचे अध्यक्ष अनंतराव उचगावकर यांनी केले.
मळगांव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदिर येथे आयोजित नेत्र तपासणी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, कार्यवाह गुरुनाथ नार्वेकर, नॅब संस्थेचे सेक्रेटरी सोमनाथ जगजिन्नी , नेत्र चिकित्सा अधिकारी सिध्दराम नागुरे ,डॉक्टर श्रीमती अदिती भोसले व दीपाली कदम होत्या.
हे शिबीर कै. यशवंती धोंडू पटेकर स्मृती प्रीत्यर्थ त्यांच्या कन्या श्रीमती उज्ज्वला यशवंतराव खानविलकर यांच्या सौजन्याने आयोजित करण्यात आले होते. सदर शिबीराला मळगाव पंचक्रोशीतील लोकानी आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतली.
यावेळी नॅब संस्थेचे सेक्रेटरी श्री. जगजिन्नी यांनी नॅब संस्थे च्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेच्या संचालिका स्नेहा खानोलकर, तर आभारप्रदर्शन गुरुनाथ नार्वेकर यांनी केले.यावेळी वाचन मंदिरचे संचालक, व कर्मचारी वर्ग उपस्थित होता. सर्वांच्या परिश्रमातून आजचे नेत्र शिबीर यशस्वी झाले.

सावंतवाडी प्रतिनिधी

error: Content is protected !!