सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा मंडलात मोदी @ 9 अभियान अंतर्गत जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , लाभार्थी मेळावा व योग दिन कार्यक्रमाचे नियोजन

सावंतवाडी प्रतिनिधि
मोदी @ 9 अभियानाची बांदा मंडलाची कार्यक्रम नियोजन बैठक अभियानाचे सावंतवाडी विधानसभेचे संयोजक प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजु परब यांच्या उपस्थितीत बाळु सावंत यांच्या निवासस्थानी संपन्न झाली .
या बैठकीचे प्रास्ताविक दादु कविटकर यांनी केले .यावेळी १४ कार्यक्रमाचे संयोजक निवडले, तसेच प्रत्येक संयोजकाबरोबर दोन सहसंयोजक नेमुन कार्यक्रमाचे नियोजन केले . तसेच बांदा मंडलामध्ये प्रामुख्याने १४ कार्यक्रमापैकी जेष्ठ कार्यकर्ता संमेलन , योग दिन व लाभार्थी मेळावा हे तिन कार्यक्रम घेण्याचे ठरले .तसेच ” संपर्क से समर्थन ” ह्या कार्यक्रमा अंतर्गत जास्तित जास्त प्रभावशाली कुटुंबांशी संपर्क करण्याचे ठरविण्यात आले . तसेच भाजपाच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये लाभार्थी मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले .
यावेळी मार्गदर्शन करताना विधानसभा संयोजक प्रसंन्ना देसाई म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात भारताची प्रतिष्ठा जगभरात उंचावत आहे . भारताचा सांस्कृतिक वारसा जागतिक पातळीवर पोहचला आहे. देशातील पायाभूत सुविधा , विकासाचे जाळे अधिक मजबूत करून आधुनिक भारताचे स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे . या अभियानात आपल्या विधानसभा मतदारसंघात बुथस्तरावर व्यापक जनसंपर्क , लाभार्थी संपर्क , समाजातील विविध घटकांशी संपर्क , जेष्ठ कार्यकर्त्यांशी संपर्क अशा कार्यक्रमातून मोदी सरकारच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची माहीती सामान्य जनतेपर्यंत पोहचवावी असे आवाहन केले .
या बैठकीत माजी जिल्हाध्यक्ष शामकांत काणेकर , मंदार कल्याणकर , मंडल अध्यक्ष महेश धुरी, शितल राऊळ , युवा नेते प्रथमेश तेली , माजी सरपंच अशोक सावंत , मंडल सरचिटणीस मधुकर देसाई , माजी जि.प.सदस्या श्वेता कोरगांवकर , बांदा सरपंचा प्रियांका नाईक , बांदा शहर अध्यक्ष बाबा काणेकर , युवा मोर्चा जि.उपाध्यक्ष जावेद खतिब , किसान मोर्चाचे अजय सावंत , जि.का.का.सदस्य गुरुनाथ सावंत , डेगवे सरपंच राजन देसाई , शेर्ले सरपंच उदय धुरी , ता.उपाध्यक्ष ज्ञानदिप राऊळ , ता.उपाध्यक्ष श्रीरंग कांबळी , गुरूनाथ पेडणेकर , शामराव सावंत , नारायण कांबळी , विकास केरकर , प्रशांत बांदेकर , उदय देऊलकर , रत्नाकर आगलावे, राजन देसाई , श्रेया केसरकर , तनुजा वाडकर , उमेश पेडणेकर , राजाराम धारगळकर , राजाराम सावंत इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . बैठकीचे आभार प्रदर्शन रुपाली शिरसाठ मॅडम ने केल .