सावंतवाडी तालुक्यातील मडूरां गावातील प्राथमिक शाळेचे छप्पर कोसळले

सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी तालुक्यातील मडुरा या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. ३ प्रशालेचे छप्पर काल मध्यरात्री पाहिल्या पाऊसात कोसळले. यात वासे व मंगलोर कौलांचे नुकसान झाले. दोन दिवसातच शाळा सुरु होण्याच्या अगोदर ही दुर्घटना झाल्याने मोठा अनर्थ टळला. गेली दोन वर्षे छप्पर दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, शिक्षण विभाग अधिकार्यांच्या चालढकल कारभारामुळे सदर दुर्घटना झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.मडुरा प्राथमिक शाळा नं. ३ चे छप्पर नादुरुस्त झाले होते. त्याबाबत शाळा व्यवस्थापन समितीने ग्रामपंचायत व शिक्षण विभागाचे लक्ष वेधले होते.