कुडाळात 9 जुलै रोजी “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित जिल्ह्यात प्रथमच “सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” कार्यक्रम.

कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य राज्यस्तरीय “एकेरी नृत्य स्पर्धेच आयोजन”(लहान गट व मोठा गट).
कणकवली/मयूर ठाकूर.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच “स्पर्धक-पालक मित्रमंडळ सिंधुदुर्ग” आयोजित,”सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा” हा कार्यक्रम घेण्यात येत आहे.या कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सर्व नृत्य-दिग्दर्शक यांचा सन्मानपूर्वक सत्कार सोहळा त्याचबरोबर नृत्य-दिग्दर्शकांचे प्रदर्शनीय सादरीकरण व मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे.सोहळा आनंदाचा,माझ्या गुरुमाऊलींचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने कुडाळ येथील सिद्धिविनायक मंगल कार्यालय येथे भव्य अशी राज्यस्तरीय “एकेरी नृत्य स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे.ही एकेरी नृत्य स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये होईल. लहान गटाची वयोमर्यादा ही 5 वर्ष ते 12 वर्ष तसेच मोठा गट वयोमर्यादा 13 वर्ष ते 40 वर्ष अशी आहॆ.स्पर्धकाने आपल आधार कार्ड नाव नोंदणी प्रसंगी देणं गरजेचं आहे.स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या स्पर्धकांचे सादरीकरण हे जास्तीत जास्त 3 मिनिटांचे असावे.तसेच प्रत्येक स्पर्धकाला सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.
♦️पारितोषिक मोठा गट :-
प्रथम क्रमांक-10,000/-
द्वितीय क्रमांक-7,000/-
तृतीय क्रमांक-4,000/- आणि उत्तेजनार्थ एकूण तीन पारितोषिके प्रत्येकी 1,000 रुपये.
♦️लहान गट बक्षीसे :-
प्रथम क्रमांक-7,000/-
द्वितीय क्रमांक-5,000/-
तृतीय क्रमांक-3,000/- आणि उत्तेजनार्थ एकूण तीन पारितोषिके प्रत्येकी 1,000 रुपये.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेश फी लहान गटासाठी 300 रुपये तर मोठ्या गटासाठी 500 रुपये इतकी आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील संपर्क क्रमांकावर संपर्क करावा :-
अमित रगजी-85300 23898.
श्रेया पाटणकर-8850733376.
हेमंत राऊळ-8080074891.
स्वरा पावस्कर-7721937100.
हा संपूर्ण कार्यक्रम ठीक दहा वाजता सुरु होणार आहॆ.अद्याप सिंधुदुर्ग जिल्ह्यात परीक्षण न केलेले आणि फिल्म इंडस्ट्री मध्ये सातत्याने कार्यरत असलेले,प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक म्हणून नावलौकिक असलेले परीक्षक हे स्पर्धेसाठी असणार आहेत.तरी या भव्य दिव्य अशा राज्यस्तरीय एकेरी नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.