युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

उपक्रमात सहभागी होण्याचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे आवाहन

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही सुशांत नाईक यांनी केले आहे.
युवासेनाप्रमुख तथा युवकांचे प्रेरणास्थान माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 13 जून रोजी
कणकवली तालुक्यात कनेडी शाखा येथे सकाळी 10 वा .रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले असून या कार्यक्रमाचे आयोजन कणकवली युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी केले आहे.
देवगड ग्रामीण रुग्णालय येथे 13 जून सकाळी 10 वा. फळ वाटप, वृक्ष लागवड कार्यक्रम होणार असून १४ जून, सकाळी ०९ वा. स्थळः इंद्रप्रस्थ हॉल देवगड येथे रक्तदान शिबिर आयोजन देवगड युवासेना तालुकाप्रमुख गणेश गांवकर यांनी केले आहे.
तर 13 जून, सायं 5 वा.
देवगड तालुक्यातील मणचे मशीद येथे गरजूंना चादर वाटप करण्यात येणार असून देवगड युवासेना तालुकाप्रमुख फरीद काझी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वैभववाडी तालुक्यांतील नाधवडे येथे १३ जून, दुपारी १२ वा. काजू वृक्ष वाटप करण्यात येणार असून
कोकीसरे युवासेना विभागप्रमुख रोहीत पावसकर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
युवासेनाप्रमुख माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या विविध कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी केले आहे.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!