साकेडीत दारू अड्डयावर धाड टाकुन गुन्हा दाखल

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाची कारवाई
तब्बल 200 लिटर रसायन नष्ट
गावठी हातभट्टीच्या दारू अड्डयावर धाड टाकून स्थानिक गुन्हा अन्वेषन विभागाच्या पोलिसांनी आज रविवारी कणकवली तालुक्यातील साकेडी येथे संशयितांच्या घराजवळ केलेल्या कारवाई मध्ये 22 लिटर गावठी दारू व 200 लिटर गुळ व नवसागर मिश्रित रसायन हस्तगत करत नष्ट केले. यामध्ये 10 लिटर जांभळाची 3 हजार रुपये किमतीची दारू, तर गुळाची 12 लिटरची 2 हजार 400 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. तर 200 लिटर नवसागर मिश्रीत रसायन नष्ट करण्यात आले. याबाबत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार बितोज जुवाव म्हपसेकर (वय 70 साकेडी बोरीची वाडी) हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, कृष्णा केसरकर, गुरुनाथ कोयंडे, आशिष जामदार यांच्या पथकाने केली.
कणकवली प्रतिनिधी