आँनलाईन फसवणुकीचे धंदे खुप तेजीमध्ये आहेत

नागरिकांनी सतर्क रहावे

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे आवाहन

वैभववाडी

आँनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या नोकरी, फर्निचर, पेन्सिल, मासे, वाईन अशा विविध प्रकारच्या विविध बिझीनेसच्या लिंक तयार करुन त्यात गुंतवणूक केली तर मोठ्या रकमेचा परतावा अगदी काही दिवसात मिळेल असे आमिष दाखऊन गुंतवणूकदास सुरुवातीस दररोज त्याला पैसे पाठवतात आणि काही दिवसांनी ती साईट बंद करुन टाकतात.अगदी पाचशे रुपयांच्या गुंतवणुकीवर चाळीस ते पन्नास दिवसात दररोज ठराविक परताव्याने आठ – दहा हजार रुपये मिळण्याच्या लालसेने अनेकजण फसवणुकीची शक्यता आहे हे समजुन सुद्धा एक जुगार म्हणुनच यात हजार दोन हजाराची सहज गुंतवणूक करतात आणि फसले जातात.
अशा आँनलाईन पध्दतीने फसवणूक झालेल्या घटनांची माहिती सोशल मीडिया, वर्तमानपत्रातून कानावर येऊन सुध्दा आँनलाईन फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. फसवणूक झाल्यास गप्प न बसता ताबडतोब जवळच्या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करुन तिचा पाठपूरावा करावा.
ग्राहकांनी या झटपट श्रीमंत होण्याचा मागे जाऊन फसवणुक करुन न घेता आपला पैसा योग्य आणि सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करा,असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने केले आहे.

error: Content is protected !!