घोडावत विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. विद्यापीठाच्या एन्व्हायरमेंटल क्लबने यासाठी पुढाकार घेतला.याचा उद्देश सर्वांनी पर्यावरणाशी कनेक्ट रहावे हा आहे.
यावेळी बोलताना कुलगुरू म्हणाले पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे काळाची गरज आहे.मानवाला नेहमीच निसर्गात राहणे आवडते परंतु वाढती लोकसंख्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे वृक्षांची संख्या कमी होत आहे. एन्व्हायरमेंटल क्लब तर्फे वृक्ष लागवडीसाठी घेतलेला पुढाकार महत्त्वाचा आहे.यासाठी त्यांनी क्लबचे कौतुक केले.
याप्रसंगी कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, अकॅडमीक डीन डॉ.उत्तम जाधव, प्रा. संजय इंगळे विद्यार्थी कल्याण मंडळाचे डीन डॉ.चेतन पाटील, डॉ. योगेश्वरी गिरी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी यांनी वृक्षारोपण केले.