कणकवलीतील हॉटेल मंजुनाथ चे मालक अनिल शानबाग यांचे निधन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल मंजुनाथ च्या ब्रँड ने एक केली होती वेगळी ओळख निर्माण

कणकवली शहरात 90 च्या दशकात हॉटेल मंजुनाथ च्या माध्यमातून कणकवली सह जिल्हा वासियांना एक वेगळी चव देणारे व जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित हॉटेल व्यवसाय म्हणून प्रसिद्ध असलेले कणकवलीतील हॉटेल मंजुनाथ चे मालक अनिल लक्ष्मण शानबाग (वय 63) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक भाऊ, तीन बहिणी, भावजय असा परिवार आहे. 1992 मध्ये कणकवली पटवर्धन चौकात हॉटेल मंजुनाथ च्या माध्यमातून अनिल शानबाग यांनी आपला हॉटेल व्यवसाय सुरू केला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हॉटेल मंजुनाथ हा एक प्रसिद्ध ब्रँड बनला होता. त्यानंतर महामार्ग चौपदरीकरणात स्टेट बँकेच्या बाजूला हे हॉटेल स्थलांतरित करण्यात आले. मितभाषी स्वभाव व नेहमीच सर्वाशी ते हसतमुख असायचे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!