घोडावत विद्यापीठात ‘कलानुभव’ प्रदर्शनाचे उद्घाटन

जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठातील स्कूल ऑफ डिझाईन प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे ‘कलानुभव’ या डिझाईन प्रदर्शनाचे उद्घाटन विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील,कुलसचिव डॉ.विवेक कायंदे यांच्या हस्ते झाले.
डिझाईन विषयाच्या विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये केलेल्या कामांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहून विश्वस्त विनायक भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या कामाचे कौतुक केले. तर कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत केलेल्या कामाची माहिती घेतली.
या विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.व्ही. कुलकर्णी यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या कष्टाबद्दल व प्रॉडक्ट डिझाईन,फॅशन,ग्राफिक, इंटिरियर डिझाईन विषयात विद्यार्थ्यांमध्ये रुची निर्माण होण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आल्याचे सांगितले. हे प्रदर्शन एक आठवडा सर्वांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनासाठी विभागातील प्रा.पूर्णेश जगद, प्रा.निलेश देसाई,प्रा. प्रिया पाटील यांनी कष्ट घेतले. यावेळी सहाय्यक अकॅडमीक डीन प्रा.संजय इंगळे, डॉ.एन.व्ही.पुजारी सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.