देशाला पुढे नेणारा अधिकारी बनावे

तुषार पवार यांचा शुभांगी पवार यांच्याकडून सत्कार

कणकवली
यावर्षीच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ( UPSC ) अत्यंत कठीण परीक्षेत उज्ज्वल यश मिळवल्याबद्दल तुषार पवार यांचा “अनादी मी अनंत मी” सामाजिक मंचाच्या अध्यक्षा शुभांगी पवार यांच्याकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र देवून सत्कार करण्यात आला.

तुषार यांनी हे दैदिप्यमान यश मिळवून सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सन्मान वाढवला आहे. हे यश येथील मुलांना खूप प्रेरणादायी आहे. तुषार पवार याने संपूर्ण भारतात ८६१ क्रमांक मिळवला आहे.

कोठेही होणारा अन्याय निवारण करण्यासाठी प्रबळ लोकांचा रोष घेणारा अधिकारी तुषार यांनी बनावे अशी आशा शुभांगी पवार यांनी व्यक्त केली. यावेळी डॉ सतीश पवार, मयूर निकम आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!