आयडियला इंग्लिश स्कूल आणि ज्युनि.कॉलेज वरवडे इथे “जागतिक पर्यावरण दिन साजरा”

कणकवली/मयुर ठाकूर
ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे या प्रशालेत नुकताच “जागतिक पर्यावरण दिन ” साजरा झाला.
पृथ्वीचे वाढते तापमान आणि पर्यावरणाच्या आणि बिघडत चाललेला समतोल याला प्रतिबंध व्हावा या हेतूने पर्यावरण दिनानिमित्त मुलांची प्रभात फेरी काढण्यात आली व वृक्षारोपण करण्यात आले यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची गरज व महत्व आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे ,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,सचिव श्री.हरिभाऊ भिसे,कार्याध्यक्ष श्री.बुलंद पटेल,सहसचिव श्री.निलेश महिंद्रकर,खजिनदार सौ.शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री.डी.पी.तानावडे,मुख्याध्यापिका सौ.अर्चना शेखर देसाई, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.