सिंधुदुर्गच्या पर्यटन विकसाकरता राज्य सरकार पूर्ण सहकार्य करणार! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना रोजगाराची संधी, कच्च्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न – केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे

सावंतवाडी शहरातील ११०कोटीच्या कामाचा शुभारंभमुळे विकासात्मक बदल होणार – मंत्री दीपक केसरकर

कोकण ही पर्यटनाची पंढरी आहे. त्यांचा सर्वागीण विकासासाठी राज्य सरकार सिंधुदुर्गचा पर्यटन दृष्ट्या विकास करायचा आहे. त्यामुळे पर्यटनाची एकही संधी गमावणार नाही .आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देऊ तसेच या ठिकाणी रोजगाराभिमुख प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे कार्यक्रमात दिला.दरम्यान स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना रोजगाराची संधी, कच्च्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. असे मत केंद्रीय उद्योग नारायण राणे यांनी सावंतवाडी येते कार्यक्रम वेळीं मत व्यक्त केले. तसेच यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी शहरातील विकासकामाला सुरावात झाल्यानें पर्यटन तसेच सर्वागीण विकासाला चालना मिळेल असे मत व्यक्त केले.

यावेळी सावंतवाडी शहरातील विवध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रिय उद्योग मंत्री नारायण राणे ,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, राज्याचे बाधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योगमत्री उदय सामंत, रविंद्र फाटक , भरत गोगावले, क्रीडा मंत्री गिरीश महाजन, व्यासीठावर आमदार नितेश राणे, युवराज लखमराजेभोसले,माजी खासदार निलेश राणे,जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी सावंतवाडी वाशिय यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार करण्यात आला.

यावेळी पर्णकुटी विश्रामगुह लोकार्पण, भाजी मंडई भूमिपूजन, सावंतवाडी शहरातील 110कोटीच्या विवध विकामाच उद्घाटन सोहळा पार पडला.

सावंतवाडी प्रतिनिधि

error: Content is protected !!