भाजपा कार्यकर्ते, न.प. प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात मश्गुल

कणकवली वासियांचे पाणी टंचाईमुळे झालेत हाल
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर यांच्या माध्यमातून शहरात टँकर द्वारे पाणीपुरवठा
कणकवली शहरात मागील तीन दिवस पाणीटंचाई ची झळ नागरिकांना बसत आहे.
ठाकरे शिवसेनेचे माजी नगरसेवक सुशांत नाईक, रुपेश नार्वेकर यांनी स्वखर्चाने आज नाथ पै नगर, बिजलीनगर, शिवाजीनगर भागात टँकर ने पाणी पुरवठा केला. कणकवली शहरात झालेल्या पाणीटंचाई ला मागील 5 वर्षांतील सत्ताधारी भाजपा कारणीभूत असल्याची टीका सुशांत नाईक यांनी केली. भाजपा कार्यकर्ते आणि कणकवली नगरपंचायत प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात मश्गुल असून कणकवली वासीयांच्या पाणीटंचाईकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. रस्ते आणि गटार कामाच्या टक्केवारीत मागील 5 वर्षे सत्ताधारी गुंतले होते अशी टीका नाईक यांनी केला.
दिगंबर वालावलकर / कणकवली