छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा

माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंनी केले अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराज मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्ष डॉ. विद्याधर तायशेटे, उपाध्यक्ष कल्याण पारकर, संस्थापक आनंद पारकर, सचिव भाई परब, सदस्य संजय ठाकूर, आत्माराम मुंज, डॉ. सुहास पावसकर, औदुंबर राणे, प्रीतम म्हापसेकर, अभय राणे, भैया आळवे, सागर राणे, निखिल बागवे, वेंकटेश सावंत आदी उपस्थित होते.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!