कोकण कट्टा तर्फे विलेपार्लेत माणुसकीची फेरी

विलेपार्ले मुंबई
कोकण कट्टा आयोजित माणुसकीची भिक्षा फेरी उपक्रमाचे यंदाचे 7 वे वर्षे होय श्री स्वामी समर्थ मठ विलेपार्ले यांचे मोलाचे सहकार्य आणि असंख्य आश्रयदाते यांच्या मुळे यंदाही या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला.
या माध्यमातून साई आधार या संस्थेच्या मुलांना 3000 (तीन हजार किलो धान्य ) तसेच दप्तरे व टॉवेल देण्यात आले व चॉकलेट व बिस्किटे शालेय साहित्य देण्यात आले मार्गदर्शक दादा गावडे. सुजीत कदम दया. मांडवकर राजू चव्हाण प्रभाकर खेडेकर साई भगत, राव राणे उपस्थित होते..