महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार व मंत्र्यावर कठोर कारवाई करण्यासाठी सीटूचे सिंधुदुर्ग जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने

सिंधुदुर्ग: सुवर्णपदक प्राप्त महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण करणाऱ्या खासदार ब्रिजभूषण सिंग व हरियाणाचे मंत्री संदीप सिंग यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी दि.१८ मे रोजी CITU संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियनच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
निदर्शने झाल्यानंतर खेळाडूंना पाठींबा व महिला कुस्तीगीरांचे लैंगिक शोषण करणाऱ्यावर कारवाई करण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांचे मार्फत पाठविण्यात आले.

error: Content is protected !!