घोडावत विद्यापीठाचा जनजागृती कार्यक्रम

जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठातील बी.बी.ए तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी साजणी या गावी ‘सामाजिक समस्या जनजागृती उपक्रम’ राबविला. येथील ग्रामस्थांना सामाजिक समस्या कारणे व उपाय यांच्या विषयी माहिती करून दिली.
यावेळी सरपंच शिवाजी पाटील, ग्रामस्थ व घोडावत विद्यापीठातील प्रा. रोहित लांडगे, प्रा.अर्जुन पाटील,प्रा.मुग्धा जोशी, प्रा.निकिता नील्ले, प्रा.स्नेहल शिंदे उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ महिला यांच्याशी थेट घरी जाऊन संवाद साधला महिलांच्या समस्या जाणून घेतल्या. आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. व्यसनाधीनते पासून दूर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले.
या कार्यक्रमाला पुरुष व महिला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यासाठी विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ.अरुण पाटील, कुलसचिव डॉ.विवेक कायंदे, वाणिज्य आणि व्यवस्थापन शाखेच्या अधिष्ठाता डॉ. योगेश्वरी गिरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

error: Content is protected !!