पावशीवासियांचा महामार्गावर चक्काजाम !

पावशी येथील सर्व्हिस रस्ता आणि बसशेड बांधकामास मंजुरी मिळण्याकरिता जनआंदोलन
कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील पावशीवासीयांनी आज सकाळी ९.३० पासून सर्विस रस्ता तसेच बसशेड बांधकामास मंजुरी मिळण्याकरिता जलआंदोलन पुकारले. पावशी ग्रामपंचायत येथे महामार्गावर स्थानिक ग्रामस्थ यावेळी या जनआंदोलनात दाखल झाले. सर्विस रस्ता आणि बसशेड नसल्याने येथील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अशी माहिती या नागरिकांनी दिली. जोपर्यंत आपली मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे पावशी गावच्या सरपंच वैशाली पावसकर यांनी स्पष्ट केले.
पावशी गावातील पावस्करवाडी, खोतवाडी, भटवाडी, मेस्त्रीवाडी भोगटेवाडी येथील ग्रामस्थांना कामानिमित्त येथील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस, बँक या ठिकाणी जावे लागते. परंतु, सर्व्हिस रोड नसल्याने या ठिकाणी अपघात घडू शकतात. याबाबत अनेकदा महामार्ग प्रशासनास सूचना केली तरी हा प्रश्न जैसे थेच आहे.
कुडाळ, प्रतिनिधी