विज्ञान संकल्पना प्रयोग कार्यशाळा

भाभा अणु संशोधन केंद्राचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत जोशी यांचे मार्गदर्शन

पोखरणमधील यशस्वी अणुचाचण्यांच्या निमित्ताने ११ मे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून देशभर पाळला जातो. भारताने मे १९९८ मध्ये राजस्थानमधील भारतीय सैन्याच्या पोखरण चाचणी रेंजवर पाच अणुस्फोटांची मालिका असलेल्या पोखरण-II चाचण्या घेतल्या. पोखरण-II चाचण्यांच्या वर्धापन दिनाची आठवण म्हणून दरवर्षी ११ मे रोजी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला जातो.
याचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञानाची आवड निर्माण व्हावी, प्रत्यक्ष कृतीतून विज्ञान व तंत्रज्ञानाची अनुभूती घेण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने विद्यानिकेतन स्कूल कसाल या ठिकाणी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता ११ मे रोजी १० ते ४ या वेळेत विज्ञान संकल्पना कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत मुलांना स्वतः विविध प्रयोग करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी भाभा अनुसंशोधन केंद्र मुंबई येथील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत जोशी मुलांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉक्टर जयंत जोशी गेली तीस वर्षे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी सक्रिय विज्ञान प्रसार करीत आहेत त्यांनी विज्ञान शिकवण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधनांची निर्मिती केली आहे तसेच देशभर 525 पेक्षा जास्त विज्ञान प्रयोग व व्याख्यानाचे कार्यक्रम घेतले आहेत. तसेच विज्ञान शिक्षकांसाठी 60 पेक्षा जास्त कार्यशाळा घेतल्या आहेत. राष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिंपियाड स्पर्धा कार्य गटातही त्यांचा सहभाग होता तसेच अनेक वृत्तपत्र व नियतकालिकातून त्यांचे विज्ञान विषय लेखन प्रसिद्ध झाले आहे. डॉ जयंत जोशी हे विज्ञान भारती कोकणप्रांतचे सहकार्य , मराठी विज्ञान परिषद मुंबई कार्यवाहक व राष्ट्रीय विज्ञान प्रसारक परिषदेचे अजीव सभासद आहेत.

या संधीचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठवी ते दहावीचे विद्यार्थी ,तसेच विज्ञान शिक्षक यांनी घ्यावा असे आवाहन विद्यानिकेतन व युरेका सायन्स सेंटर तर्फे करण्यात येत आहे. या कार्यशाळेसाठी प्रथम येणाऱ्या साठ विद्यार्थ्यांनाच प्रवेश देण्यात येईल. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी सुषमा केणी 9284035326 यांच्याशी संपर्क साधावा

error: Content is protected !!