वागदेतील अपघातात जखमींची जिल्हाधिकाऱ्यांकडून विचारपूस

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात भेट केली पाहणी
डॉक्टरांकडून उपचाराचा घेतला आढावा
वागदे मध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आज सायंकाळी कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत अपघातातील जखमींची विचारपूस केली. तसेच यावेळी डॉ. संतोष चौगुले यांच्यासह अन्य उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून उपचाराचा आढावा देखील घेतला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत प्रांताधिकारी जगदीश कातकर, तहसीलदार आर जे पवार यांच्या सह अधिकारी उपस्थित होते.
दिगंबर वालावलकर /कणकवली





