भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केली अपघातातील जखमींची विचारपूस

जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना दिल्या तातडीने उपचाराच्या सूचना

कणकवली तालुक्यात वागदे येथे आज दुपारी भीषण अपघात झाल्यानंतर या अपघातग्रस्तांना तातडीने जिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान अपघाताची माहिती मिळतात सायंकाळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी जिल्हा रुग्णालयात अपघातग्रस्त यांची भेट घेत विचारपूस केली. तसेच याबाबत रुग्णालयाच्या डॉक्टरांशी चर्चा करत त्यांना सूचना देखील दिल्या.जखमींना उपचाराकरता कोणती हलगर्जीपणा होता नये याची काळजी घ्या अशा सूचना देखील श्री तेली यांनी दिल्या. तसेच प्रत्येक रुग्णांची विचारपूस करत अपघातग्रस्तांना मदतीची कोणती उणीव भासू देऊ नका असे श्री तेली यांनी सांगितले. यावेळी डीन डॉ. गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागरगोजे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, डॉ. इंगळे आदी उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर /कणकवली

error: Content is protected !!