सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा संपन्न
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. सभेत संघटनेचा आढावा घेण्यात आला. येणाऱ्या जिल्हापरिषद,पंचायत समिती, वेंगुर्ला, मालवण, सावंतवाडी नगरपरिषद तसेच कणकवली नगरपंचायत निवडणूकी संदर्भात चर्चा करण्यात आली आणि सदर निवडणूकांच्या संदर्भात व जिल्ह्यातील काँग्रेस संघटना बळकट करण्याच्या संदर्भात जिल्ह्याचे प्रभारी शशांक बावचकर, माजी जिल्हाध्यक्ष विकासभाई सावंत आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना जिल्हा प्रभारी शशांक बावचकर यांनी फ्रंटल ऑर्गनायझेशन व इतर विभाग बळकट करून काँग्रेसला जिल्ह्यात उभारी देण्यासंदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण,महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष महेश उर्फ बाळू अंधारी,देवगड तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी,कणकवली तालुकाध्यक्ष प्रदिप मांजरेकर,सावंतवाडी तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर, विभावरी सुकी, अमिदी मेस्त्री, रोजगार व स्वयंरोजगार विभाग जिल्हाध्यक्षा सुंदरवल्ली पडियाची, कोकण विभाग मिडिया समन्वयक केतनकुमार गावडे, जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, प्रवीण वरूनकर,उल्हास मणचेकर,रवींद्र म्हापसेकर,बाळा धाऊसकर,सुमेधा सावंत,माया चिटणीस,अशोक राणे,प्रकाश डिचोलकर, आत्माराम उर्फ दादा सोकटे,समीर वंजारी, आनंद परूळेकर,सरदार ताजर,जस्मीन लक्शमेश्वर,हेमंत माळकर,अमित मांडवकर, रुपेश साळुंखे,अहमद बोबडे,गौस बोबडे, खलील रमदूल, सर्फराज बोबडे तसेच वक्ता प्रशिक्षणासाठी आलेले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस वक्ता विभागाचे सरचिटणीस भारत यात्री गणेश रेड्डी उपस्थित होते.
निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ