पळसंब सुपूत्र प्रदिप परब यांचा पोलीस पदकाने सन्मान

आचरा –अर्जुन बापर्डेकर
पळसंब गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबई भायखळा येथे हवालदार पदावर कार्यरत असलेले प्रदिप साबाजी परब यांचा पोलीस सेवेत बजावलेल्या कार्याची दखल घेत पोलीस सन्मान पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मुंबई पोलीस दलात १९९३साली रुजू झालेल्या परब यांनी प्रामाणिक आणि कर्तव्य निष्ठ कर्मचारी म्हणून ठसा उमटवला होता.त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा पोलीस सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे.महाराष्ट्र पोलीस विभागातील विविध प्रवर्गात उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी, अंमलदार, हवालदार आदींना हा पुरस्कार दिला जातो.सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.पळसंब गावच्या सुपूत्राला मिळालेल्या या सन्मानाबद्धल पळसंब सरपंच महेश वरक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!