सावंतवाडी तालुक्यातील तळवडे ठिकाणी प्रकाश परब मित्रमंडळ सेवाभावी संस्था मार्फत १ मे ते 5 मे पर्यंत पर्यटन महोत्सवाचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि
सावंतवाडी तालुक्यातील तळवडे येथील प्रकाश परब मित्र मंडळ, सर्व सेवा संस्था व तळवडे ग्रामस्थ यांच्यामार्फत तळवडे ठिकाणी पर्यटन महोत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी १मे रोजी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे, तसेच सिमगोत्सवाचे उद्घाटन होणार आहे .यावेळी गावातील कलाकारांचे प्रभाव न्याय कार्यक्रम सादरीकरण होणार आहे.
तसेच जिल्ह्यातील निमंत्रित कलाकारांचे स्पर्धात्मक कार्यक्रम सादरीकरण होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रतीम पारितोषिक 15000 द्वितीय पारितोषिक 10,000 तृतीय पारितोषिक 8000 आहे
२ मे रोजी गावातील स्थानिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे ,तर र? रात्री नऊ वाजता दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. तसेच तीन मे दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार असून ४मे रोजी सायंकाळी सात वाजताची दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे .५ मे रोजी सिद्धेश्वर दशावतार नाट्य मंडळ यांचा नाट्यप्रयोग होणार आहे हे कार्यक्रम १ मे ५ मे पर्यंत चालणार आहे.
प्रकाश परब मित्र मंडळ व सर्व सेवाभावी संस्था व तळवडे ग्रामस्थ मार्फत दरवर्षी तळवडे पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. याला तळवडे पंचकोशीतील रसिक वर्ग यांचा चांगला प्रतिसाद मिळतो.