सावंतवाडी शहरात रंगणार नेत्रदीपक असा “सावंतवाडी कोकण नाऊ महोत्सव २०२३”

गृहपयोगी वस्तूंची खरेदी, फन फेअर फूड फेस्टिवल आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम ठरणार महोत्सवाचं आकर्षण.

विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते दिनांक ११ मे रोजी होणार महोत्सवाचे उद्घाटन. ११ मे ते २१ मे २०२३ पर्यंत सुरू राहणार महोत्सव

महोत्सवाचे स्थळ – जिमखाना मैदान सावंतवाडी.
स्टॉल बुकिंग साठी संपर्क क्रमांक – 7564909091/9822742374

सावंतवाडी/मयुर ठाकूर.

कोकण नाऊ चॅनल आयोजित “कोकण नाऊ सावंतवाडी महोत्सव २०२३” चे आयोजन दिनांक ११ मे ते २१ मे २०२३ पर्यंत सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर करण्यात आले आहे.कुडाळ येथे अशाच प्रकारच्या महोत्सवाच्या आयोजनानंतर आता सावंतवाडी येथे देखील हा महोत्सव होत आहे.सावंतवाडीकरांसाठी पर्वणी म्हणून कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेल आहे.या महोत्सवामध्ये सुमारे 250 हून अधिक विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये विविध गृहपयोगी वस्तू, कॉस्मेटिक साहित्य,पारंपारिक तसेच देश-विदेशी खाद्यपदार्थांचे प्रदर्शन तसेच विक्री अर्थातच फूड फेस्टिवल आणि या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत आयोजित केलेलं फन फेअर तसेच या महोत्सवामध्ये मनोरंजनात्मक विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलेल आहे.यामध्ये ग्रुप डान्स स्पर्धा,गायन स्पर्धा,खेळ पैठणीचा,जिल्ह्यातील नावलौकिक प्राप्त विविध डान्स अकॅडमींचे कार्यक्रम,ऑर्केस्ट्रा,फॅशन शो,पप्पी- कॅट-डॉग शो,तसेच असेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत.तरी या सर्व कार्यक्रमांचा आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन कोकण नाऊ चॅनलचे संचालक विकास गावकर यांनी केले आहे.या महोत्सवामध्ये स्थानिक लोक कलाकारांना देखील प्राधान्य देण्यात येणार असून कोकण नाऊ च्या व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रम करू इच्छिणाऱ्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा-
9370440893.
8408929923.

error: Content is protected !!