कणकवली तालुक्यातील जलतारा व शोषखड्डा मोहिमेचा नांदगाव मध्ये शुभारंभ

सभापती, उपसभापतींनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना उद्दिष्ट पूर्ततेसाठी केले आवाहन
कणकवली तालुक्यामध्ये जलतारा व शोषखड्डा मोहिमेचा शुभारंभ तालुक्याच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या हस्ते करण्यात आला. कणकवली तालुक्यात नांदगाव ग्रामपंचायत मार्फत करण्यात आलेल्या शोषखड्डा व जलतारा या कामांचा शुभारंभ करत असताना सभापती हर्षदा वाळके व उपसभापती सोनू सावंत यांनी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीने ही कामे सातत्यपूर्ण करून उद्दिष्ट पूर्ती करा असे आवाहन केले. यावेळी गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, सरपंच रविराज मोरोजकर, ग्राम विकास अधिकारी, तांत्रिक सहाय्यक, लाभार्थी, आणि ग्रामरोजगार सहाय्यक आदी उपस्थित होते.






