संयुक्त श्रमदानातून तळेरे वाघाची वाडी येथे ‘वनराई बंधारा’ यशस्वीरीत्या पूर्ण

ग्रामीण भागातील पाण्याचे महत्त्व ओळखून जलसंधारणाच्या दृष्टीने एक कौतुकास्पद उपक्रम नुकताच पार पडला. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी शाळा तळेरे वाघाची वाडी येथील शिक्षक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य आणि स्थानिक महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बायाचा ओहोळ’ येथे लोकसहभागातून व श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला.
वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या भासू नये आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी या उद्देशाने या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली आहे. या उपक्रमात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच उस्फूर्तपणे सहभाग घेतला
या श्रमदान उपक्रमात ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवला
मा. श्री. संदेश श्रीधर तांबे (मुख्याध्यापक, शाळा तळेरे वाघाची वाडी)
मा. सौ. मानसी महेश भोगले (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती)
सौ. सावली अशोक भोगले (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती)
सौ. सपना समीर चव्हाण (सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती)
सौ. शोभा आबाजी भोगले (पालक)
सौ. वंदना विठोबा चव्हाण (पालक)
सौ. सुप्रिया चंद्रकांत चव्हाण
कु. गार्गी चव्हाण (माजी विद्यार्थिनी)
कु. स्वरा भोगले (माजी विद्यार्थिनी)
शाळेय विद्यार्थी पालक आणि महिला बचत गटाने एकत्र येऊन केलेले हे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. यामुळे केवळ पाण्याचा साठा होणार नसून मुलांमध्ये बालवयातच जलसाक्षरता आणि श्रमदानाचे संस्कार रुजण्यास मदत होईल.”
तळेरे वाघाची वाडी येथील या सामाजिक उपक्रमाचे संपूर्ण परिसरातून आणि शिक्षण वर्गातून मोठे कौतुक होत आहे.






