शेअर मार्केट मध्ये अधिकचा नफा मिळवण्याचे आमिष दाखवत फसवणूक केलेला आरोपी कोल्हापूर येथून अटक

कणकवली पोलिसांना गेले दहा महिने देत होता चकवा
संशयित आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी
कणकवली पोलिसांच्या पथकाची उल्लेखनीय कारवाई
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिकचा नफा मिळवण्याचे अमिष दाखवून ती परत न देता आर्थिक फसवणूक करून सुमारे दहा महिन्यापासून फरार असलेल्या संदीप अंकुश पाटील (वय 35 वर्ष रा. राजारामपुरी कोल्हापूर) या आरोपीला कणकवली पोलिसांनी जेरबंद केले. कणकवली येथील एका फिर्यादी महिलेशी आरोपी याने ओळख करून घेऊन त्यांचा विश्वास संपादन केला. दिनांक 18/12/2024 रोजी 12.00 वा ते दिनांक 24/06/2025 रोजी सायंकाळी 07.00 वा. चे मुदतीत शेअर मार्केटमध्ये त्यांची 12, 27,800/- रुपये रक्कम गुंतवणूक करून घेऊन अधिकचा नफा मिळवण्याचे अमिष दाखवून ती परत न देता त्यांची 12,27,800/- रुपये इतक्या रकमेची आर्थिक फसवणूक केलेले होती. तक्रारदार हिने दिले तक्रारीनुसार कणकवली पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318, 318(4) प्रमाणे गुन्हा सहा डिसेंबर 2025 रोजी दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील आरोपी संदीप आनंदा पाटील, हा गुन्हा दाखल झाल्यापासून सुमारे दहा महिने वेगवेगळ्या ठिकाणी व पत्त्यावर राहून पोलिसांना गुंगारा देत होता. याच दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे राजेंद्र नानचे, पांडुरंग पांढरे, या महिला पोलीस कॉन्स्टेबल रेश्मा कांबळे या पथकाने तांत्रिक कौशल्य व तपास कौशल्याचा वापर करत 24/09/2026 रोजी सायंकाळी पारगाव ता. हातकणगले जि. कोल्हापूर येथून ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाणे येथे आणले आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडी मिळालेली आहे. ही कारवाई मोहन दहिकर, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, नयोमी साटम, अप्पर पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्या सुचनेनुसार पोलीस निरीक्षक कमलेश बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नानचे, पांडुरंग पांढरे, रेश्मा कांबळे यांच्या पथकाने केलेली आहे. कणकवली पोलीस यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे कौतुक केले जात आहे.
दिगंबर वालावलकर कणकवली






