कणकवली मधील पुरोहित गुरुदास उर्फ बाळू करंबेळकर यांचे निधन
कणकवली शहरातील मधलीवाडी येथील रहिवासी गुरुदास उर्फ बाळू दिनकर करंबेळकर (वय 70) यांचे आज सायंकाळी उपचारादरम्यान पडवे येथील रुग्णालयात निधन झाले. कणकवली मध्ये पुरोहित म्हणून ते काम करायचे. बाळू करंबेळकर या नावाने ते कणकवली परिसरात परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सून, नातवंडे, भाऊ असा मोठा परिवार आहे. कणकवली मधील पुरोहित प्रभव व प्रणव करंबेळकर यांचे ते वडील होत. त्यांच्यावर आज रात्री येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कणकवली प्रतिनिधी






