एसआरएम कॉलेज मध्ये रंगला विद्यार्थी बाजार

‘थिअरी’ उतरली प्रत्यक्ष ‘बाजारपेठेत’
४५ स्टॉल्स मधून शंभर विद्यार्थी सहभागी
शिक्षण घेताना बऱ्याचवेळा आपण थिअरी शिकतो. पण जे काही शकलेले आहे त्याचा प्रत्यक्ष उपयोग शिकताना करता येतोच असं नाही. हीच बाब लक्षात घेऊन येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (BMS) आणि बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स (BAF) विभागातर्फे शुक्रवारी “विद्यार्थी बाजार” (Student Bazaar) चे आयोजन करण्यात आले होते. याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुमारे १०० विद्यार्थ्यांनी मांडलेले ४५ स्टॉल्स हे हा विद्यार्थी बाजाराचं वैशिट्य ठरलं.
विद्यार्थी बाजारचं उद्घाटन संध्या तेरसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या व्यावसायिक कल्पनांचे कौतुक केले. तसेच, त्यांच्या आगामी दिवाळी कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमास कमशिप्र मंडळाचे सरकार्यवाह अनंत वैद्य सर, मुख्याधिकारी सुरेश चव्हाण, संस्था सदस्या प्रतिभा पाटणकर, प्राचार्य डॉ. स्मिता सुरवसे, BMS व BAF विभागाचे HOD दयानंद ठाकूर तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
“स्टुडंट्स बाजार”मध्ये एकूण ४५ स्टॉल्स उभारण्यात आले होते आणि सुमारे १०० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी विविध व्यवसाय कल्पना, उत्पादने आणि सेवा यांचे सादरीकरण केले. गणेशोत्सवाचा निमित्ताने विविध वस्तू स्टॉल्स मधून मांडण्यात आल्या होत्या. त्याच बरोबर फूड स्टॉल्स मधून विविध खाद्यपदार्थ विक्रीला ठेवण्यात आले होते. फूड स्टॉल्सना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्टॉल्सधारक विद्यार्थ्यांनी महाविद्यलायच्या या संकल्पनेचं स्वागत केलं.
या उपक्रमाला मान्यवर पाहुणे, विद्यार्थी, कर्मचारीवर्ग आणि भेट देणाऱ्या नागरिकांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या उद्योजकीय कल्पना प्रत्यक्षात साकारण्याची आणि व्यवसाय व्यवस्थापनाचा अनुभव घेण्याची उत्तम संधी मिळाली. या प्रदर्शनासाठी प्रा. सोमदत्त चव्हाण, प्रा. सोनाली आंगचेकर, प्रा. जकीरा राजगुरू, प्रा. दयानंद ठाकूर, प्रा. रघुनाथ सवतन, प्रा. प्रणव तेंडोलकर, प्रा. सबा शेख, प्रा. गीतश्री ठाकूर आणि प्रा. सुवर्णा निकम यांनी सहकार्य केलं.
या उपक्रमाअंतर्गत, विद्यार्थी त्यांच्यातील सर्जनशीलता आणि उद्योजकता कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी स्वतः बनवलेल्या (गृहनिर्मित व हस्तकला) वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आले.






