कणकवली नगरपंचायतची पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा 2026

कणकवली शहरवासीयांनी सहभागी होण्याचे आवाहन
कणकवली नगरपंचायत च्या मार्फत पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा 2026 आयोजित करणेत आली आहे. स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे आहेत.
स्पर्धेचे नियम व अटी
१.सदर स्पर्धा कणकवली शहरातील स्पर्धकांपुरती मर्यादित आहे.
२.ज्या स्पर्धकांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी पर्यावरण पूरक गणेश उत्सव स्पर्धा 2026 बाबतची पोस्ट/रील त्यांच्या स्वतःच्या facebook किंवा instagram या सोशल मिडिया वर टाकायची असून कणकवली नगरपंचायतीच्या अधिकृत facebook पेजला Kankavali Nagarpanchayat किंवा इन्स्टाच्या kankavalinp या पेजला follow व tag करावयाचे आहे. तसेच खालील ई टॅगचा वापर करणे अनिवार्य आहे. #majhivasundhara, #MissionLife, #swachhsurvekshan2026, #3R, #Kankavalinagarpanchayat FBlink – https://www.facebook.com/kankavali.nagarpanchayat.7 instagram link https://www.instagram.com/kankavalinp/
३. स्पर्धेचा कालावधी दिनांक 15 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 पर्यंत असेल. या दरम्यानच्या पोस्ट/रील्स गृहीत धरल्या जातील.
४. गणेश मूर्ती ही संपूर्ण पर्यावरण पूरक म्हणजेच केवळ शाडू माती, शेतमाती किंवा नैसर्गिक मातीच असावी.
५. गणेशोत्सव सजावट संपूर्ण नैसर्गिक/पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून केलेली असावी.एकल वापर प्लास्टिक वापर टाळावा.
६. सजावटीत कोणत्याही अविघटनशील(थर्माकोल,पीओपी, प्लास्टिक सजावटीचे साहित्य इ. ) साहित्यांचा समावेश नसावा. ७.पर्यावरण संवर्धन, स्वच्छतेबाबतचे टाकाऊ वस्तूंचे पुर्नवापर व सामाजिक संदेश इ.विषयावर आधारित सजावटीला प्रामुख्याने प्राधान्य देण्यात येईल.
८. एकूण पोस्ट/रील पैकी १० आकर्षिक पर्यावरण पूरक पोस्ट/रील निवडल्या जातील त्यांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी केल्यानंतर ३ विजेते निवडण्यात येतील.
९. स्पर्धेचा निकाल अनंत चतुर्थी दिवशी कणकवली नगरपंचायतीच्या अधिकृत facebook व instagram पेजवर जाहीर करण्यात येईल.
१०. वरील नमूद स्पर्धेचे नियम पालन न करणाऱ्या स्पर्धकांना स्पर्धेत भाग घेता येणार नाही.
पारितोषिक स्वरूप
१.प्रथम क्रमांक – रु.५०००/- सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र
२.द्वितीय क्रमांक – रु.३०००/- सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र
३.तृतीय क्रमांक- रु.२०००/- सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र
*उत्तेजनार्थ ५ स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.






