आयडियल इंग्लिश स्कूल आणि जूनियर कॉलेजच्या कु.सुश्रुत नानलचे तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत यश.

कणकवली/मयूर ठाकूर
ल गो सामंत विद्यालय हरकुळ बुद्रुक येथे नुकत्याच संपन्न झालेल्या तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत ज्ञानदा शिक्षण संस्थेच्या कॉलेजच्या इयत्ता अकरावीचा विद्यार्थी सुश्रुत मंदार नानल याने घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्या चमकदार खेळीच्या जोरावर त्याने हे यश मिळवले आहे.
या यशाबद्दल त्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.विद्याधर तायशेटे,उपाध्यक्ष श्री. मोहन सावंत सर,कार्याध्यक्ष श्री. बुलंद पटेल,संस्थापक सचिव प्राध्यापक हरिभाऊ भिसे सर,सहसचिव प्राध्यापक निलेश महिंद्रकर सर खजिनदार सौ. शीतल सावंत मॅडम,सल्लागार श्री. डी. पी तानावडे,आयडियल इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सौ. अर्चना शेखर देसाई तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.






