प्राथमिक आरोग्य केंद्र आचराचे वैद्यकिय अधिकारी म्हणून डॉ. संकेत बालाजीराव मेहरकर यांनी पदभार स्विकारला

प्राथमिक आरोग्य केंद्र, आचरा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून डॉ. संकेत बालाजीराव मेहरकर (एमबीबीएस )यांनी शुक्रवार ११ सप्टेंबर पासून पदभार स्वीकारला.
त्यांच्या हजर होण्यामुळे आचरा परिसरातील आरोग्य सेवेत अधिक बळकटी येणार असून, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होणार असल्याचे बोलले जात आहे. जानेवारी २०२६पासून ओरोस जिल्हा रुग्णालय येथे कार्यरत असलेले
डॉ. मेहरकर
यांच्या नियुक्तीबद्दल जिल्हा परिषद सदस्या वर्षा सांबारी,आचरा सरपंच जेरॉन फर्नांडिस यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे भेट देऊन स्वागत केले.यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे, सामाजिक कार्यकर्ते अभय भोसले,मांगिरीष सांबारी आदी उपस्थित होते.त्यांच्या नियुक्ती बद्धल समाधान व्यक्त होत आहे.






