वनरक्षक अविनाश राठोड यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा बदली करा

शेतकरी लाकूड व्यापारी यांच्यातून होतेय मागणी
कणकवली तालुक्यातील वनरक्षक अविनाश रामराव राठोड हे 2015 पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनविभाग सावंतवाडी वनपरिक्षेत्र कणकवली या ठिकाणी कार्यरत होते तब्बल अकरा वर्षे त्यांनी अनेक वेळा ते वनाचे संरक्षण व जंगलाला आगीपासून वाचवणे हे अनेक वेळा केलेले आहे. तसेच शिकारी पासून रोखणे व वन चोरीचे प्रकार त्याने अनेकदा रोखले आहे. आणि गोरगरिब शेतकऱ्यांचे वन्य प्राण्या कडून होणारे नुकसान भरपाई हे तातडीने ते जागेवर जाऊन पाहणी करून पंचनामा करून त्यांना मदत करायची सेवा त्यांनी दिली असे असताना त्यांचीच बदली सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये करण्यात आली असा सवाल उपस्थित केला जात आहे. अनेक गावातील व्यापारी शेतकरी यांना ते समजून सांगायचे व शेतकऱ्यांचे काम तातडीने मार्गी लावायचे व कुठलाही काम शेतकऱ्याचा थांबून ठेवायचे नाही अशी त्यांची लोकाभिमुख सेवेची पद्धत होती. त्यामुळे त्यांना परत या जिल्ह्यात करून आणावे असे शेतकरी व लाकूड व्यापारी हे करत आहेत. अनेक वर्षापासून शेतकऱ्यांची सेवा केली बिडवाडी .पिसेकमते भरणी माईन कणकवली वरवडे भिरवंडे नरडवे कळसुली .डिगवळे .जांभळगाव नाटळ कुंभवडे खारेपाटण यातील अनेक शेतकरी लाकूड व्यावसायिक यांच्यातून पुन्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवा देण्यासाठी त्यांच्या बदलीची मागणी करत आहेत.






