कनकनगर वासियांचा गेली अनेक वर्षांचा प्रश्न उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या माध्यमातून लागला मार्ग

स्वखर्चातून रस्ता रुंदीकरणाचे केले काम

कनकनगर वासीयांमधून समाधान व्यक्त

कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्या माध्यमातून कनकनगर येथील नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी तसेच परिसराच्या विकासासाठी केलेल्या मागणीला यश आले आहे., कनकनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे. रस्ता रुंद झाल्यामुळे अवजड तसेच मोठ्या वाहनांची ये-जा अधिक सुलभ होणार असून, परिसरातील वाहतुकीची समस्या कमी होण्यास मदत होणार आहे.
या कामासाठी कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी स्वखर्च करून कनकनगर वासियांना सहकार्य केले. तसेच कनकनगर येथील नागरिकांनीही या कामासाठी आवश्यक सहकार्य केले आहे. सर्वांच्या सहकार्यामुळे रस्ता रुंदीकरणाचे काम मार्गी लागण्यास मोठी मदत झाली.
दरम्यान, सुशांत नाईक यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट देऊन सुरू असलेल्या कामाची पाहणी केली. रस्ता रुंदीकरणाचे काम योग्य पद्धतीने आणि लवकर पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी संबंधितांशी चर्चा केली.
यावेळी बाबू जाधव, प्रवीण सावंत, हर्षद शिक्रे, संतोष सावंत, मोर्ये आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!