योग प्रात्यक्षिके सादर करत साजरी केली गुरुपौर्णिमा योगशिक्षक अशोक कांबळी यांचा अनोखा उपक्रम

गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने मामा पेडणेकर यांचे घराच्या गच्चीवर योग वर्गाचे आयोजन करण्यात आले.योगशिक्षक अशोक कांबळी यांनी सर्वांचे स्वागत करून गुरूपौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व सांगितले. योगगुरू भगवान शंकर आणि महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.योग साधक गोपाळ खेडेकरसर यांनी महर्षी व्यास यांच्या कार्याचा परिचय करून दिला.त्यानंतर प्रार्थनेत योग वर्गाची सुरुवात झाली.पूर्व नियोजनानुसार उपस्थित प्रत्येकाने गुरुना वंदन करून आपल्या आवडीची दोन व गुरु सांगतील ती दोन आसने करून दाखवली.तसेच त्या त्या आसनांचे उपयोग (परिणाम) शरीरात कसे होतात ते प्रत्येकाने सांगितले.योगशिक्षक श्री कांबळी यांनी शिर्षासनपूर्व आसने, शिर्षासन, शिर्षासनात पद्मासन व इतर हालचालींचे प्रात्यक्षिक करून इतर काही आसनेनांचे प्रात्यक्षिक दाखविले. भस्रीका, ओंकार,कपालभाती प्राणायामाचे सामूहिक प्रात्यक्षिक झाले.विठ्ठल नामाचा गजर व टाळीयोगाने योग वर्गाचा शेवट केला गेला.या योग वर्गाचे वैशिष्ट्य म्हणजे संगिताच्या तालावर केलेली सामूहिक ३० योगासने.






