प्रकाश तोरसकर यांचे निधन

पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष उमेश तोरसकर यांना बंधुशोक

तालुक्यातील पिंगुळी चिंदरकरवाडी येथील प्रकाश गणपत तोरसकर (वय 59) यांचे बुधवारी सायंकाळी पिंगुळी येथील निवासस्थानी निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
गेले काहीवर्ष ते आजारी होते. चार दिवसापूर्वी त्यांना गोवा बांबुळी येथे उपचारासाठी दाखल केले होते. उपचारानंतर बुधवारी सकाळी त्याना आपल्या घरी आणण्यात आले होते. मात्र सायंकाळी त्यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ,बहीण पुतण्या असा परिवार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात पत्रकार नागरिक यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट घेत कुटुंबियांचेसांत्वन केले पिंगुळी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर बुधवारी सायंकाळी उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.

error: Content is protected !!