हुमरमळा (वालावल) येथे करमळीवाडीतील साकवाचे काम पूर्ण

पं. स. सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांच्या प्रयत्नांना यश
हुमरमळा (वालावल) येथील करमळीवाडीमध्ये भाटकर घर ते कुलस्वामिनी मंदिरापर्यंत जाणाऱ्या वाटेवरील साकवाचे काम पूर्ण झाले आहे. पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे आणि सरपंच अमृत देसाई यांच्या प्रयत्नातून हे काम मार्गी लागले.
हुमरमळा गावातील एकही विकासकाम प्रलंबित राहू नये, यासाठी सरपंच अमृत देसाई आणि पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे गावात छोटी-मोठी विकासकामे मार्गी लागत आहेत, असे अर्चना बंगे यांनी सांगितले.
गावातील विकासकामांसाठी स्थानिकांचे कायम सहकार्य मिळत असल्याने कामे करताना कोणतीही अडचण येत नाही. गावाच्या विकासासाठी आवश्यक असलेली कामे मार्गी लावण्यासाठी आपण कटिबद्ध असून, यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही बंगे यांनी दिली.
यावेळी माजी सरपंच सुरेश वालावलकर, रमा वालावलकर, गणेश वालावलकर, सुमन वालावलकर, किशोर वालावलकर, गणेश केसरकर, विजय वालावलकर, महेश वालावलकर, किशोर पेढणेकर, उदय खडपकर, अनु आकलेकर, दीपक वालावलकर, विष्णू वालावलकर, हेमंत कद्रेकर, योगेश कानडे, रुपेश तुळसकर आदी उपस्थित होते.






