जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलचे वर्चस्व

पाच गटांत प्रथम क्रमांक

कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड

दिनांक ६ व ७ ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाट हायस्कूलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत पाच गटांत प्रथम क्रमांक मिळवला. मुलींच्या तीन आणि मुलांच्या दोन गटांनी विजेतेपद पटकावत प्रशालेची विजयाची परंपरा कायम राखली.
दिनांक ६ ऑक्टोबर रोजी कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर मुलींच्या सर्व वयोगटांतील स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत पाट हायस्कूलचे १४, १७ आणि १९ वर्षांखालील मुलींचे संघ सहभागी झाले होते. तिन्ही संघांनी विजेतेपद मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या मुलांच्या स्पर्धेत १४ आणि १९ वर्षांखालील दोन्ही संघांनी विजय मिळवला. या यशामुळे प्रशालेने जिल्हास्तरावर पाच गटांत प्रथम क्रमांक मिळवण्याचा बहुमान संपादन केला. विजयी संघांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

विजयी संघ आणि खेळाडू

१४ वर्षांखालील मुली : कर्णधार खुशी कोचरेकर, अदिती घाडी, साक्षी प्रभू, शांती मुंड्ये, वेदश्री दाभोलकर, मयुरी केरकर, धार्मि गोसावी, कृतिका राऊळ, आरोही पाटकर आणि आराध्या पाटकर.

१४ वर्षांखालील मुले : कर्णधार वेदांत शृंगारे, कुणाल रावले, सहज बुरुड, विघ्नेश सावंत, रेहान नार्वेकर, राजदत्त राऊळ, रघुनाथ सारंग, भार्गव पेडणेकर, ध्रुव भगत, चैतन्य खोत, चिन्मय पाटकर आणि सोहम कोचरेकर.

१७ वर्षांखालील मुली : कर्णधार गायत्री चीपकर, श्रेया सागवेकर, सार्थकी फणसेकर, आर्या ठाकूर, आर्या प्रभू, कोमल कुडव, चिन्मय सकरे, तन्वी दाभोलकर, दीपश्री खोत, धनदा सावंत, निधी चव्हाण आणि हर्षी मोर्ये.

१९ वर्षांखालील मुली : कर्णधार वैभवी केळुसकर, अनन्या तेली, वेदिका गोसावी, लावण्या पराडकर, लावण्या मेस्त्री, माहेश्वरी राऊळ, युगा कोचरेकर, नृतिका राणे, नाविन्या निवतकर, उर्वशा निवतकर आणि शर्वरी वायंगणकर.

१९ वर्षांखालील मुले : कर्णधार यश आरोलकर, सुयश पाटकर, विराज देसाई, आदेश पडते, मांगल्य मेतर, पृथ्वी भगत, निखिल राटुळ, ध्रुव ठाकूर, जयेश निर्गुण, ऋग्वेद परब, आर्यन खोबरेकर आणि हिमांशू रेडकर.

मार्गदर्शकांचे योगदान; विजेत्यांचे कौतुक

या सर्व खेळाडूंना प्रशालेचे क्रीडाशिक्षक संजय पवार, दत्तात्रय कुबल, माजी क्रीडाशिक्षक हंजनकर सर, माजी खेळाडू रुपेश कोनकर तसेच आजी-माजी खेळाडू आणि पालकवर्ग यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेचे मुख्याध्यापक बोंदर सर, पर्यवेक्षिका सौ. मोडक मॅडम, संस्थेचे चेअरमन देवदत्त साळगावकर, कार्यवाह विजय ठाकूर आणि इतर संस्था पदाधिकाऱ्यांनी सर्व विजयी खेळाडू व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या क्रीडाशिक्षकांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. तसेच कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी जाणाऱ्या सर्व संघांना शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!