सेवा संकल्प अभियानांतर्गत उपक्रमामध्ये कणकवली शहर मंडळ राज्यात प्रथम

प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांनी केले तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा सत्कार

सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचाही सन्मान

सेवा संकल्प अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा की कहानी या कार्यक्रमांतर्गत लाभार्थ्यांच्या बाईट घेण्यासाठी कणकवली मंडल चे अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांनी सर्वाधिक परिश्रम घेत आपल्या सहकाऱ्यांसमवेत महाराष्ट्र राज्यात पहिला क्रमांक पटकावला. यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा यामध्ये राज्यात पहिला क्रमांक आहे. यानिमित्त प्रदेश संघटन महामंत्री सतीश धोंड यांनी भाजपा मंडळ अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विविध अभियानांची माहिती दिली. आणि यशस्वी कार्यकर्त्यांचा सन्मान केला. अभियान अंतर्गत या अभियानाचे सहसंयोजक व सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण परब यांचेही अभिनंदन करण्यात आले.
जिल्हाभरात या कार्यक्रमाचे संयोजक श्रीकृष्ण परब आणि मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री यांचे अभिनंदन करण्यात आले
यावेळी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, निसार शेख , मंडल उपाध्यक्ष संदीप सावंत ,सरपंच सचिन पारधिये ,सरपंच अजित पवार, सरपंच सुशील कदम ,पपू पुजारे,सुधीर सावंत बाबजी चव्हाण ,भगवान दळवी ,विजय चिंदरकर,सदा चव्हाण, अमोल रासम,कीर्ती कुमार राणे ,सुभाष मालंडकर,प्रशांत राणे ,नितीन राणे विश्वरूप लाड ,किशोर राणे उपस्थित होते.

error: Content is protected !!