आजपासून भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह

लाचखोरीविरोधात निर्भयपणे तक्रार करा!

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन

भ्रष्टाचारमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, लाच देऊ नये किंवा घेऊ नये आणि भ्रष्टाचाराच्या घटनांविरोधात निर्भयपणे तक्रार करावी, असे आवाहन सिंधुदुर्गच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे. २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत भ्रष्टाचार प्रतिबंधक जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यंदाच्या सप्ताहाची संकल्पना ‘सत्यनिष्ठेतून समृद्धीकडे’अशी आहे.
पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील, पोलीस निरीक्षक विद्या जाधव आणि पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने नागरिकांना हे जाहीर आवाहन केले आहे. शासकीय कामासाठी कोणी लाचेची मागणी केल्यास किंवा भ्रष्टाचाराचा प्रकार निदर्शनास आल्यास नागरिकांनी पुढे येऊन संबंधित विभागाकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
लाचखोरीला आळा घालण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही मूल्ये जोपासून भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे. लाच देऊ नका, लाच घेऊ नका आणि भ्रष्टाचाराला मूक संमतीही देऊ नका’, असा संदेश या जनजागृती सप्ताहाच्या माध्यमातून देण्यात येत आहे.

लाच मागितल्यास किंवा भ्रष्टाचाराबाबत तक्रार करण्यासाठी संपर्क :

  • टोल फ्री क्रमांक : १०६४
  • कार्यालयीन व्हॉट्सॲप क्रमांक : ९९२२८९१०६४
  • कार्यालयीन दूरध्वनी : ०२३६२-२२२२८९

भ्रष्टाचारमुक्त समाज निर्माण करणे ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचेही कर्तव्य आहे. त्यामुळे नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात जागरूक राहून, प्रामाणिक आणि पारदर्शक प्रशासनासाठी या जनजागृती सप्ताहात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सिंधुदुर्ग यांच्याकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!