बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेच्या खुशी शिरोडकर आणि मुसेब पटेलची जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड

कुडाळ तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी
कुडाळ येथील बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलची विद्यार्थिनी कु. खुशी आत्माराम शिरोडकर आणि बॅ. नाथ पै ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मुसेब इकबाल पटेल या दोघांची जिल्हास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जयप्रकाश नारायण माध्यमिक विद्यालय, वाडोस येथे कुडाळ तालुकास्तरीय शालेय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलमध्ये सातवीत शिकणाऱ्या खुशी शिरोडकर हिने १४ वर्षांखालील गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्ध्यांवर मात केली आणि जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रवेश निश्चित केला. तर बॅ. नाथ पै ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी मुसेब पटेल याने १९ वर्षांखालील गटात प्रभावी कामगिरी करीत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धा ओरोस येथील जिल्हा क्रीडा संकुलात लवकरच होणार आहेत. या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष उमेश गाळवणकर, बॅ. नाथ पै सेंट्रल स्कूलच्या प्राचार्या चैताली बांदेकर, बॅ. नाथ पै ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या पल्लवी कामत, ज्येष्ठ क्रीडा शिक्षक रोहिदास राणे, क्रीडा व्यवस्थापक शिक्षिका प्राची परब तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.






