एस आय आर संदर्भात मतदारांनी जागरूक राहावे

कुटुंबाची माहिती अधिकृत कर्मचाऱ्यांकडे भरून द्यावी

कोणत्याही अनधिकृत कर्मचाऱ्यांमार्फत काम सुरू नाही

तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांची माहिती

1 जुलै 2026 पासून विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरु झाले आहे. 29 जुलैपर्यंत प्रत्येक मतदाराचा गणना form (Enumeration form) दिला जाणार आहे. कुटुंबातील एका व्यक्तीकडे कुटुंबातील सर्वांचा फॉर्म दिला जाणार आहे. सदरचा फॉर्म मतदारांनी 29 जुलै पर्यंत भरून द्यावयाचा आहे. जे मतदार form भरून देणार नाहीत अशा मतदारांचे नाव यादीतून वगळले जाऊ शकते. अशी माहिती तहसिलदार दीक्षांत देशपांडे यांनी दिली. यावेळी बोलताना तहसीलदार म्हणाले, सदरची नावे वगळल्यानंतर मतदारयादी प्रसिद्‌ध केली जाणार असून नावे वगळल्या नंतर 05/08/2026 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. या यादीतील नावांवर आक्षेप असल्यास अथवा चुकीने नाव कमी झाले असल्यास अशा सर्व आक्षेपांवर सुनावणी दिनांक ५/८/२०२६ ते ४/९/२०२६ पर्यंत घेतल्या जाणार आहेत.
अंतिम मतदारयादी 10 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसिद्‌ध केली जाईल.
सर्व प्रक्रिया भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पार पाडली जात आहे. सर्व राजकीय पक्षांनी प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (BLA) दिलेले आहेत. शासनाच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) मार्फत होणाऱ्या प्रत्येक कार्यवाहीबाबत BLA यांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांचेशी संवाद साधणे आवश्यक आहे.
कणकवली तालुक्यातील राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष व BLA यांची बैठक तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला 4 तालुकाध्यक्ष व 25 BLA उपस्थित होते. यामध्ये सर्व प्रक्रिया पारदर्शक व निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले . कणकवली तालुक्यातील सर्व 138 केंद्रावरील BLO हे स्वतः सर्व कामकाज पार पडत आहेत.
त्यांचे मदतीला सहाय्यक देखील देण्यात आलेले आहेत. कोणत्याही अनधिकृत व्यक्ती मार्फत फॉर्म वाटप करत नाहीत. कोणत्याही विशिष्ट BLO यांची तक्रार असल्यास तसे तहसील कार्यालयात कळविण्यात यावे, त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असे तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे.

error: Content is protected !!