एसआरआय मध्ये कणकवली शहरात अनधिकृत रीत्या फॉर्म चे वाटप सुरू!

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांची तहसीलदारांकडे तक्रार

अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची केली मागणी

कणकवली शहरांमध्ये एस.आय. आर. (SIR) चे अत्यंत महत्वाचे शासकीय काम सुरु आहे. हे काम अत्यंत संवेदनशील असून यामध्ये अचूकता असणे अत्यंत आवश्यक आहे. ठिकाणी काही अधिकारी कर्मचारी नियमाला हरतापासून वाटप करत असल्याचा आरोप करत कणकवलीची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली तहसीलदारांकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. या तक्रारी त्यांनी म्हटले आहे, अत्यंत खेदाने आपल्या निदर्शनास आणून द्यावे लागत आहे की, काही स्थानिक व्यक्ती/कर्मचारी शासकीय नियमांना हरताळ फासून, आपल्या मर्जीनुसार स्थानिक पातळीवर अनधिकृत फॉर्मचे वाटप करत आहेत. परंतु प्रत्यक्षात अनेक ठिकाणी BLO स्वतः पडताळणी करण्याऐवजी स्थानिक व्यक्तींना फॉर्म देऊन, “तुमच्या ओळखीचे कोण आहेत ते सांगा अशा पद्धतीने माहिती गोळा करत असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे प्रत्यक्ष घरभेट व पडताळणी न झाल्यास या मोहिमेचा मूळ उद्देश पूर्ण होणार नाही.
मूळ शासकीय पद्धतीचा अवलंब न करता, केवळ स्वतःचे काम कमी व्हावे या स्वार्थी हेतूने हे लोक अशा पळवाटा शोधत आहेत. या अनधिकृत आणि ढिसाळ पद्धतीमुळे शासकीय माहितीमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी, चुका आणि विसंगती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात मोठे शासकीय व कायदेशीर घोळ निर्माण होऊ शकतात.
कोणत्याही महत्वाच्या शासकीय कामात अशा प्रकारे स्थानिक पातळीवर नियम बदलणे किंवा चुकीच्या पद्धतीने फॉर्म वाटणे हा थेट शासकीय प्रक्रियेतील हस्तक्षेप आणि बेजबाबदारपणा आहे. प्रकरणाची तातडीने दखल घेऊन, सदर एस. आय. आर. (SIR) कामाची योग्य ती चौकशी करण्यात यावी.जे लोक अशा प्रकारे अनधिकृत फॉर्म वाटून शासकीय कामात हलगर्जीपणा करत आहेत, त्यांच्यावर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. सदर काम पूर्णपणे पारदर्शक, कायदेशीर आणि योग्य शासकीय पद्धतीनेच पूर्ण रहावे यासाठी संबंधित यंत्रणेला कडक आदेश देण्यात यावेत. अशी मागणी श्री पारकर यांनी केली आहे.

error: Content is protected !!