शिष्यवृत्ती परीक्षेत कुडाळ हायस्कूलचे घवघवीत यश

आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत वरद जयंत वझे तालुक्यात पहिला

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेत क.म.शि.प्र. मंडळाचे कुडाळ हायस्कूल, कुडाळ यांनी उल्लेखनीय यश संपादन केले.
प्रशालेतून इयत्ता 5 वी परीक्षेस 94 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 23 विद्यार्थी पात्र ठरले तर 3 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
इयत्ता 8 वी परीक्षेस 70 विद्यार्थी बसले. 23 विद्यार्थी पात्र ठरले आणि 12 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली.
पाचवी परीक्षेत गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे, कु. सामंत सावली शेखर (224 गुण, 74.66%), जिल्हा 29 वा, तालुका 4 था, कु. मेस्त्री देवश्री सत्यवान (214 गुण, 71.33%) जिल्हा 43 वा, तालुका 7 वा, कु. कांदळगावकर अन्वी गजानन (208 गुण, 69.33%) जिल्हा 55 वा, तालुका 11 वा क्रमांक. आठवी परीक्षेतील गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे, वझे पार्थ जयंत (260 गुण, 86.66%) जिल्हा 4 था, तालुका 1 ला), कालकुंद्रीकर स्वराज कृष्णा (244 गुण, 81.33%) जिल्हा 7 वा, तालुका 2 रा, कु. धुरी निधी महेश (242 गुण, 80.66%) जिल्हा 8 वा, तालुका 3 रा, कु. परब रिया धनंजय (236 गुण, 78.66%), जिल्हा 11 वा, तालुका 5 वा, कु. पवार मैथिली संतोष (232 गुण, 77.34%), जिल्हा 14 वा, तालुका 6 वा, कु. सामंत सलोनी शेखर (224 गुण, 74.66%) जिल्हा 15 वा, तालुका 7 वा, पालवे शौर्य धोंडी (218 गुण, 72.66%) जिल्हा 17 वा, तालुका 9 वा, सावंत वासुदेव संतोष (218 गुण, 72.66%) जिल्हा 17 वा, तालुका 9 वा, चव्हाण चिन्मय महेश (202 गुण, 67.33%) जिल्हा 27 वा, तालुका 11 वा, कु. शिरसाट अस्मी अमोल (202 गुण, 67.33%), जिल्हा 27 वा, तालुका 11 वा, मर्गज अथर्व आनंद (198 गुण, 66%) जिल्हा 35 वा, तालुका 15 वा, ठाकूर वरद रवींद्र (192 गुण, 64%) जिल्हा 40 वा, तालुका 17 वा क्रमांक. या सर्व विद्यार्थ्यांना इ. डी. जाधव, एस. सी. गंगावणे, एस. के. परब, ए. ए. पोटे, पी. ए. पोटे, एन. एन. कांदळगावकर, एस. एस. ठाकूर, जी. बी. वैद्य, जी. बी. शिरसाट, एन. पी. दरवडा, एस. पी. कडूलकर, आर. सी. खाकर, आर. ए. शिरसाट, एम. एन. कुबल, डी. सी. शिंगाडे, वाय. एम. सामंत व ए. आर. तोरसकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
या सर्वं यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे उपकार्याध्यक्ष अरविंद शिरसाट, उपाध्यक्ष का. आ. सामंत, सरकार्यवाह अनंत वैद्य, सहकार्यवाह महेंद्र गवस, सीईओ सुरेश चव्हाण, मुख्याध्यापक विपिन वराडे, पर्यवेक्षक रंजन तेली, ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य एन. के. साळवी, सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!