चिंदर प्राथमिक शाळांमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून वह्या वाटप

विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या माध्यमातून चिंदर गावातील केंद्र शाळा नं १, तेरई, कुंभारवाडी, पालकरवाडी, चिंदरबाजार, लब्देवाडी, अपराजवाडी आदी प्राथमिक शाळांमध्ये मोफत वह्या वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना आचरा विभाग प्रमुख संतोष कोदे,मंगेश गावकर, मनोज हडकर, भाऊ हडकर, दत्ता वराडकर, अजित साटम, शशिकांत नाटेकर, सागर परुळेकर यांसह अन्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!