पुजारेवाडी युवाईकडून श्रमदानातून रस्ता सफाई

आचरा बाजारपेठ कडून आचरातिठा कावलेदुकानकडे जाणा-या अंतर्गत रस्त्याची सफाई पुजारेवाडी युवावर्गाकडून करण्यात आली. त्यांच्या या कामाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. आठवडा बाजार किंवा इतर वेळी बाजारपेठ देऊळवाडी या भागात आचरा तिठा येथून जाणारा उपयुक्त रस्ता असलेल्या बाजारपेठ कडे जाणा-या अंतर्गत रस्त्यांवर झाडे वेली वाढल्याने वाहनचालकांना तसेच सरपटणाऱ्या जनावरांच्या दृष्टीने पादचाऱ्यांसाठी धोकादायक बनला होता. याबाबत पुजारेवाडी येथील युवकांनी पुढाकार घेत श्रमदानातून रस्ता स्वच्छ केला. यावेळीरुपेश पुजारे, शरद पवार (बंडो), आनंद पेंडूरकर,रामचंद्र पुजारे, राहुल पुजारे, दुर्गेश पुजारे, रितेश पुजारे, अमोल गुरव, मनोज पुजारे, विघ्नेश पवार,यश पाल, अक्षय पुजारे,हरीश परब,हर्शद पेंडुरकर ,जय घाडी,रुद्र घाडी आदी सहभागी झाले होते.






