अखेर शासनाकडून प्राप्त झालेल्या केरोसीनचे कणकवलीत कन्झ्युमर्स सोसायटी मार्फत वितरण सुरू
प्रति कार्डधारकाला 3 लिटर केरोसीनचे वितरण
सोसायटी चेअरमन संदीप नलावडे यांच्या हस्ते वितरणाचा शुभारंभ
राज्य शासनाने जाहीर केलेल्या धोरणानुसार अखेर सिंधुदुर्ग जिल्ह्यात केरोसीन चा पुरवठा करण्यात आला असून प्रति कार्डधारक 3 लिटर असे केरोसीन वितरण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या केरोसीन वितरणाचा शुभारंभ कणकवली मध्ये कन्झ्युमर्स सोसायटी मध्ये करण्यात आला. सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे सचिव सुनील महाजन रुपेश पेडणेकर जावेद शेख व शिधापत्रिका धारक यांच्या उपस्थितीमध्ये केरोसीनचे वितरण करण्यात आले. ज्या नागरिकांकडे शिधापत्रिका नाही अशा नागरिकांना देखील ग्रामपंचायतचा रहिवासी पुरावा ग्राह्य धरून केरोसीन वितरण करण्यात येणार आहे. अशी माहिती श्री नलावडे यांनी दिली.





